VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी
गडचिरोली, ०२ ऑक्टोंबर २०२४::- राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे आज सकाळी १२ वाजताच्या सुमारास कोटगल एमआयडीसी येथील हेलीपॅडवर शासकीय हेलीकॉप्टरने आगमन झाले. प्रशासनाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.
वने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह, पोलीस उप महानिरीक्षक अंकित गोयल, पोलीस अधीक्षक श्री निलोत्पल, सहायक जिल्हाधिकारी राहुल मीना,अपर जिल्हाधिकारी विवेक घोडके आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांना पोलीस दलाच्या पथकाद्वारे मानवंदना देण्यात आली.