VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
Gadchiroli/सिरोंचा ,०२ ऑक्टोंबर २०२४::- तालुक्यातील मादाराम येथील विद्युत रोहीत्र नादुरुस्त असल्यामुळे मादाराम परिसरात विजेची समस्या होती. त्या परिसरातील जनतेनी माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज यांची भेट घेऊन समस्या मांडली तेव्हा मराविम च्या अधिकार्यांना ही समस्या लवकर सोडविण्याबद्दल सांगितले.रितसर प्रक्रीया बोरमपल्लीचे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मल्लन्ना संगर्ती यांनी करुन आलापल्लीला पोहोचले.आलापल्लीच्या सर्व पदाधिकार्यांनी मराविम च्या कार्यालयात पोहोचवुन प्रयत्न केल्यावर नवे रोहीत्र मादारामकडे रवाना करण्यात आले.प्रसंगी उपस्थित बोरमपल्ली चे तटामुक्ती अध्यक्ष मल्लन्ना सगर्ती, भाजपा ता.महामंत्री अभीजीत शेंडे, आलापल्ली पेसा अध्यक्ष दीपक तोगरवार,शहर अध्यक्ष अंकुश शेंडे, हर्षीद वर्मा, व बोरमपल्ली तील गावकाऱ्यासह स्थानिक कार्यकर्ते ऊपस्थित होते.