VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी
Gadchiroli/अहेरी, ०१ ऑक्टोंबर २०२४::- तालुक्यातील महागाव येथील कु.माला पोच्या दुर्गे ( वय 17 )वर्षे सिकेल सेल बिमारीने खूपच त्याबेत बघडले आहे.माल्ला दुर्गेची आई उपचारासाठी त्यांना अहेरी उपजिल्हा रुग्णालयत भर्ती करण्यात आली.सदर विषय नागरिक व कार्यकर्त्यांकडून अजय कंकडालवार यांना माहिती सांगतच उपजिल्हा रुग्णालय येथे जाऊन डॉ.पेंदाम साहेबांन कडून त्यांच्या त्याबत बाबत जाणून घेतले.त्यावेळी दुर्गे यांचे नातेवाईकांनी त्यांचा आर्थिक अडचण बाबत सांगितले.काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार दुर्गे कुटुंबाची आर्थिक अडचण बघून एक हात पुढे करत त्या कुटुंबाला बाहेरच्या औषध व इतर खर्चासाठी आर्थिक मदत केले आहे.यावेळी कंकडालवार सोबत अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे,माजी उपसरपंच अशोक येलमुले,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,प्रमोद गोडसेलवार,नरेश गर्गमसह स्थानिक कार्यकर्ते तसेच दुर्गे परिवारातील नातेवाईक उपस्थित होते.