VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी
गडचिरोली,१ ऑक्टोंबर २०२४::- राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या २ ऑक्टोबर रोजीच्या नियोजित दौऱ्याच्या अनुषंगाने प्रभारी जिल्हाधिकारी आयुषी सिंह यांनी आज नियोजन भवन येथे आढावा घेतला. अधिकार्यांनी राजशिष्टाचाराचे पालन करून त्यांचेवर सोपविलेली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडण्याचे व चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्याचे निर्देश त्यांनी यंत्रणेला दिले.राज्यपालांच्या दौर्यादरम्यान भेट देण्यात येणार्या ठिकाणी स्वच्छता राहील यादृष्टीने कार्यवाही करावी, वीजपुरवठा सुरळीत ठेवावा, अद्ययावत आरोग्य पथक सर्व सुविधांसह सज्ज ठेवण्याच्या सूचनाही जिल्हाधिकार्यांनी यावेळी दिल्या. बैठकीस सर्व संबंधित विभागाचे प्रमुख उपस्थित होते. आयुषी सिंह यांनी गोंडवाना विद्यापीठ, हेलिपॅड व विश्रामगृह येथे भेट देवून तयारीची पाहणी केली.