VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी
महिला बचतगटांना ग्रामसंघ भवन बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देणार.
Gadchiroli/अहेरी,२९ सप्टेंबर २०२४::- आज स्त्री प्रत्येकच क्षेत्रात पुढे जात असून ग्रामीण भागातील महिलासुध्दा आता मागे राहिल्या नाहीत.महिलांचा आर्थिक विकास साधण्यासाठी महिला बचत गट महत्त्वाचे माध्यम आहे.बचतगटांमुळे महिलांना गावातच रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.बचतगटच्या माध्यमातून आपल्या महिला सक्षम बनल्या पाहिजे असे मत यावेळी माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी व्यक्त केले.अहेरी तालुक्यातील नागेपल्ली ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या फुसुकपल्ली येथे 15 महीला बचतगट आहे,त्यामध्ये 150 पेक्षा अधिक महिला आहे.पण महिलांसाठी ग्रामसंघ भवन नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.त्यामुळे तेथील महिलांनी अहेरी येथील राजमहाल येथे निवेदनद्वारे माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्याकडे बचतगटांसाठी ग्रामसंघ भवन बांधकाम करण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली.यावेळी राजे साहेबांनी बचतगट महीलाचं निवेदन स्वीकारत येणाऱ्या काही महिन्यात महीला बचतगटाना फुसुकपल्ली येथे सुसज्ज असा ग्रामसंघ भवन बांधकाम करण्यासाठी निधी उपलब्ध करून देऊ व सर्वतोपरी सहकार्य करू असे आश्वासन दिले.यावेळी फुसुकपल्ली येथील सामाजिक कार्यकर्ते प्रमोद भोयर,महिला बचतगट अध्यक्ष सपनाताई पोरटेत,सचिव रोशनी ताई आतकुरवार,कोषाध्यक्ष राजेश्वरी पोरटेत,ग्रामपंचायत सदस्य शेवंताताई भोयर,सोना रागून्डी,जिजाबाई काटरेलवार,ललिता चौधरी,सविता सादगरे,यशोदा कुडमेथे तसेच मोठ्या संख्येने महिलावर्ग उपस्थित होते.