VAINGANGA NEWS 24/प्रतिनिधि – दिलखुश बोदलकर
गडचिरोली/लखमापूर बोरी,२९ सप्टेंबर २०२४::- चामोर्शी तालुक्यातील कुणघाडा रै या गावातील जय भाद्रपद गणेश मंडळाच्या वतीने दरवर्षी सामाजिक उपक्रम राबवील्या जाते. या वर्षी मंडळाच्या वतीने नेहरू युवा केंद्र प्रेरित शिवछत्रपती युवक मंडळ लखमापूर बोरी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता हीच सेवा – स्वभाव स्वछता, संस्कार स्वच्छता अंतर्गत गावातील सार्वजनिक चौक, ग्रामपंचायत कार्यालयाचे परिसर, पाणी पुरवठा टाकीचे परिसरारील कचरा साफ करून ग्राम स्वच्छता अभियान राबवीत* व भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करून सामाजिक भान जोपासले. यावेळेस जय भाद्रपद गणेश मंडळाचे सह सर्व पदाधिकारी, सदस्य व ग्रामिण रुग्णालय चामोर्शी चे कर्मचारी उपस्थित होते. मंडळाच्या वतीने दररोज वेगवेगळे सामाजिक बांधिलकी जोपासनारे सामाजिक कार्य बघून परिसरातील नागरिकांनी मंडळाचे खूप कौतुक केले.