VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
गोंडवाना विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाराला राहणार उपस्थित.
गडचिरोली ,२९ सप्टेंबर २०२४ राज्यपाल सी. पी. राधाकृष्ण दिनांक 2 ऑक्टोंबर रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचे कार्यक्रम पुढील प्रमाणे राहतील. दिनांक २ ऑक्टोंबर रोजी दुपारी १२ वाजता गडचिरोली येथे आगमन व गोंडवाना विद्यापीठाच्या दीक्षांत समारोह व वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास विद्यापीठाच्या प्रांगणात उपस्थिती. दुपारी १ ते १.४५ पर्यंत शासकीय विश्रामगृह येथे राखीव. दुपारी १.४५ ते ४.३० पर्यंत विश्रामगृह येथे मान्यवरांशी भेटी व चर्चा. दुपारी ४.४० वाजता गडचिरोली येथून नागपूरकडे प्रयाण.