Friday, October 4, 2024
HomeAheriउद्या आल्लापल्ली येथे काँग्रेस पक्षाचे हजारो कार्यकर्ते एकवटणार...

उद्या आल्लापल्ली येथे काँग्रेस पक्षाचे हजारो कार्यकर्ते एकवटणार…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी

कार्यकर्ते आघाडीचे तुतारीची बिगूल वाजविणार की… एकला चलोचे ‘पंजा’ हाती घेणार.

Gadchiroli/अहेरी,२८ सप्टेंबर २०२४::- काँग्रेस पक्षाचे अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक व गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार आणि काँग्रेस पक्षाचे आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष व सेवानिवृत्त वनअधिकारी यांनी पुढाकार घेऊन अहेरी विधानसभा क्षेत्रातील पाचही तालुक्यांमधील काँग्रेस पक्षाचे कार्यकर्त्यांचे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.अहेरी विधानसभा क्षेत्राचे मध्यवर्ती ठिकाणं असलेल्या आल्लापल्ली येथे उद्याला सदरहू मेळावा पार पडणार असून या मेळाव्यात अहेरी विधानसभा क्षेत्रातील पाचही तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकवटणार असल्याची माहिती मिळाली आहेत.विधानसभा निवडणकीची पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने विधानसभा क्षेत्रातल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन केल्याने या मेळाव्याकडे विशेषतः अहेरीतील विविध राजकीय पक्षांचे लक्ष लागून आहेत.आल्लापल्ली येथे आयोजित मेळाव्याला प्रामुख्याने राज्याचे विरोधी पक्ष नेते ना.विजयभाऊ वडेट्टीवार,काँग्रेसचे युवा नेते कुणाल चौधरी,गडचिरोलीचे खासदार डॉ.नामदेवराव किरसान,आमदार डॉ.अभिजीत वंजारी,जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा अध्यक्ष महेंद्रभाऊ ब्राम्हणवाडे ,काँग्रेसचे समन्वयक अजयभाऊ कंकडालवार,काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हनमंतू मडावीसह प्रदेश व जिल्हा पातळीवरील डझनभर नेतेमंडळी उपस्थित राहून कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणूकी संदर्भात मार्गदर्शन करणार आहे.लोकसभा निवडणुकीपूर्वी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार आणि सेवानिवृत्त सहाय्यक वनअधिकारी हनमंतू मडावी यांनी आपापल्या समर्थकांसह  काँग्रेस पक्षात प्रवेश केले होते.या दोघांच्या पक्ष प्रवेशामुळे अहेरी विधानसभा क्षेत्रात काँग्रेस पक्षाला जणूकाही नवंसंजीवनी मिळाली होती.याचे सकारात्मक परिणाम सुध्दा  लोकसभा निवडणुकीत पक्षाचे उमेदवाराला झाल्याचे निकालावरून पाहायला दिसून आले होते.नोव्हेंबर महिन्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून अहेरी विधानसभा क्षेत्रातील आजी – माजीसहअनेक संभाव्य उमेदवारांची सगळीकडे कार्यकर्त्यांची भेटीगाठी,मेळाव्यांचे आयोजनातून जनसंवादाचे रेलचेल वाढल्याचे दिसून येत असतांनाच काँग्रेस पक्षाने सुध्दा स्वतंत्रपणे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजनातून शक्तिप्रदर्शनाला सुरुवात केल्याने याचे मुख्यतः अहेरीचे राजकीय वर्तुळात एक नवीन चर्चेला पेव्ह पुटलेला आहे.आल्लापल्ली येथे आयोजित काँग्रेस पक्षाचे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यातून पक्षाचे प्रमुख नेते अहेरी विधानसभा निवडणूकी संदर्भात आपल्या कार्यकर्त्यांना  आघाडी धर्माचे पालनाचे मूलमंत्र देणार की…? एकला चलोचे नारा….देणार …? याकडे सर्वांचे नजरा लागून आहेत.

shrawan wakode

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular

बातमी कॉफी पेस्ट नका करू शेअर करा प्लिज....