VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी
गडचिरोल /चामोर्शी,२८ सप्टेंबर २०२४::- राजमुद्रा फॉउंडेशन लखमापूर बोरी, आमदार डॉ. होळी मित्र परिवार व प्राथमिक आरोग्य केंद्र लखमापूर बोरी तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान हेच श्रेष्ठ दान असल्यामुळे रक्तदात्याने केलेले रक्तदान हे गरजवंतासाठी अमृत असते हेच पाहून प्राथमिक आरोग्य केंद्र, लखमापूर बोरी इथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या वेळी रक्त पेढी गडचिरोली येथील चमु ने रक्तदात्यांचे रक्तगट तपासून रक्त संकलन केले. रक्तदान शिबिरामध्ये दिक्षा गेडाम, रत्नमाला कुनघाडकर, संदीप वैरागडे, प्रणय वैरागडे, अंकुश वैरागडे, अनिकेत कुनघाडकर, महेश सातपुते, गणेश सातपुते, मंगेश गव्हारे, सुनिल वासेकर, रोशन वासेकर, रविंद्र वासेकर, ईश्वर सूरजागडे, सूरज पिपरे, रवि करकुरवार, राहुल बारसागडे, अमोल गव्हरे, रत्नाकर बावणे, जीवन बावणे, अमन शेंडे इत्यादींनी रक्तदान केले.सर्व रक्तदात्याना जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने प्रमाणपत्र देण्यात आले. शिबिरात गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉ. देवराव होळी यांनी उपस्थिती दर्शवून रक्तदात्याची आरोग्य तपासणी करून शिबिराची शोभा वाढविली. रक्तदान शिबिराचे आयोजनासाठी राजमुद्रा फॉउंडेशन व प्राथ. आरोग्य केंद्र लखमापूर बोरीतील कर्मचारी सर्व पदाधिकारी व सदस्यांचे सहकार्य लाभले. यशस्वीतेसाठी रवींद्र वासेकर यांचे विशेष सहकार्य लाभले.