Friday, October 4, 2024
HomeAheriसामाजिक जाणं असलेलं युवानेतृत्व म्हणजे अजयभाऊ कंकडालवार…

सामाजिक जाणं असलेलं युवानेतृत्व म्हणजे अजयभाऊ कंकडालवार…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी

गरीब व गरजूवंतांचे गळ्यातील ताईत बनून सामाजिक कार्याला केले सुरुवात.

गडचिरोली/अहेरी,२८ सप्टेंबर २०२४::- जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद यशस्वीपणे भूषविणारे,शांत संयमी व मृदू भाषिक असलेले अहेरिचे सेवाभावी अजय कंकडालवार यांनी काँग्रेस पक्ष प्रवेशानंतर संपूर्ण अहेरी विधानसभा मतदारसंघ पिंजून काढतं विधानसभा क्षेत्रातल्या दुर्गम भागातील गरीब,आदिवासी बांधवांना वेळोवेळी मदतीचा हात देत त्यांनी आपले सामाजिक कार्याची वेगळेपण सिध्द केले आहे.त्यांनी या क्षेत्रातील गर्जुवंत गरिबांचे सामाजिक जाण ठेवत आपल्या नि:स्वार्थ सेवा कार्याला निरंतर सुरू ठेवले आहे.गडचिरोली जिल्ह्यात अलीकडच्या काळात सामाजिक संवेदना कमालीच्या बोचट झाल्यात.आपुलकी जपणारी माणसेही दुर्मीळ होऊ लागलीत.कुणाशी कुणाला काही देणघेणच नाही अशी भयावह व्यवस्था आपल्या समाजव्यवस्थेत जोराने शिरकाव करू लागलीय.ख-या अर्थाने बघितल तर हा सामाजिक चिंतनाचा मोठा विषय आहे.पण अशाही सामाजिक आणीबाणीत काही माणस मात्र निव्वळ माणुसकीच जोपासत नाही तर ते राजकारणापलीकडे जात सामाजिक प्रश्नांना घेत मदतीचा हात देतात.सध्या गडचिरोलीच्या दुर्गम भागात अशा एका व्यक्ती मत्वाचीच जोरदार चर्चा होतांना दिसून येत आहे.अनं त्यांच नावं अजयभाऊ कंकडलवार आहे.अहेरी विधानसभा मतदारसंघातील अतिशय दुर्गम भागातून गेल्या काही दिवसात अनेक मोठया बातम्या समोर आल्या.अशा भागात कंकडालवार हे अतिशय ताकदीने अनं तेवढीच संवेदनशिलता ठेवत काम करित आहेत.गडचिरोली जिल्ह्यातील मोठा भाग अजूनही विकासाच्या  मुख्य प्रवाहापासून दुर आहे.अहेरी विधानसभा मतदारसंघातील मोठा भाग अतिशय दुर्गम आहे.येथील नागरिकांच्या सामान्य समस्या सोडविण्यात येथील लोकप्रतिनीधींना,प्रशासनाला अदयापही यश आल नाही.येथील नागरिक मूलभूत गर्जांपासून वंचित आहेत.         काही दिवसांपूर्वी एका गर्भवती महिलेला जेसीबीच्या बकेटमधून पूढे पोहचविण्यात आल.अगदी अलीकडेच मातापित्यांना आपल्या दोन लेकरांचे प्रेत खांदयावर उचलून तब्बल पंधरा किलोमीटरचा वेदनादायी प्रवास करावा लागला.या घटनांनी समाजमन पेटल असतांना येथील सत्ताधा-यांना मात्र त्यांच्याशी काही देणघेण नसल्याची संतापदायक स्थिती आहे.अजय कंकडालवार यांनी गडचिरोली जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषवीत आपल्या नेतृत्वाची झलक दाखविली होतीे.लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेटटीवार यांच्या मार्गदर्शनात आपल्या समर्थकांसह काॅग्रेसमध्ये प्रवेश घेतला.अनं अहेरी मतदारसंघात अगदी कमी कालावधीत पक्षाला मोठ यश मिळवून दिल.गडचिरोली जिल्हयात तिन विधानसभा मतदारसंघ आहेत.हे तिनही मतदारसंघ अनुसूचीत जमातीसाठी राखीव आहेत.कंकडालवार हे ओबीसी प्रवर्गात येतात.ते विधानसभा निवडणूक लढवूही शकत नाही.तरी पण त्यांनी आपल्या कामांचा धडाकाच लावला आहे.अनेक गरीबांच्या मदतीला धाऊन जाणारा युवानेता अशी त्यांची सगळीकडे ओळख झाली आहे.मतदारसंघातील नागरिकांच्या काही समस्या असल्या कि ते कंकडालवार यांच्याकडे मोठया आशेने बघतात.सध्या विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर अनेक नेते सक्रिय झाले आहेत.पण कंकडालवार यांनी सातत्याने आपले सामाजिक काम सुरू ठेवले आहे.त्यांच्या मतदार संघात सुरू असलेल्या अनेक सेवाभावी कार्यक्रम अन् गरिबांचे गळ्यातील ताईत बनून गरिबांसाठी निरंतर सुरू ठेवलेले एक हात मदतीचे निस्वार्थ सेवेमुळे येथील जनता त्यांच्याकडे सामाजिक जाणं असलेलं युवानेतृत्व म्हणून पाहू लागलंय.

shrawan wakode

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular

बातमी कॉफी पेस्ट नका करू शेअर करा प्लिज....