VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी
गडचिरोली/देसाईगंज,२७ सप्टेंबर २०२४::- अवघ्या काही दिवसातच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार असून सर्व राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवार आप आपल्या तयारीत लागले आहेत…महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी कडून गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी विधानसभा क्षेत्रात योग्य निवडून येण्यायोग्य उमेदवार न दिल्यास आम्ही आघाडीतून गडचिरोली जिल्ह्यात बाहेर पडू आणि समाजवादी पक्षाकडून स्वतंत्र उमेदवार आरमोरी विधानसभा क्षेत्रात उभा करू असा खळबळ जनक विधान समाजवादी पक्षाचे जिल्हा अध्यक्ष इलियास खान यांनी वृत्तपत्र प्रतिनिधी यांच्याशी केलेला आहे या विधानाने गडचिरोली जिल्ह्यात आघाडीत बिघाडी होण्याची दाट शक्यता दिसत आहे.. तसेच आणखी समविचारी पक्ष् सोबत घेऊन जिल्ह्यात येणारी विधानसभा निवडणूक लढवीणार असेही मत त्यांनी या वेळी मांडले. गडचिरोली जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी असो किव्हा राष्ट्रीय काँग्रेस पार्टी हे एकाच माळ्याचे मनी असून फक्त सत्तेच्या लालसेपोटी आपले राजकारण करत आहेत जिल्ह्यात अनेक प्रश्न आहेत याकडे दोन्ही पक्ष मुद्दाम कानाडोळा करीत आहेत,अश्या स्वार्थी लोकांना यांची जागा दाखविणे आवाश्यक आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सर्व आघाडीतील मित्र पक्षाना सोबत घेऊन उमेदवार निवडावे आणि आरमोरी विधानसभा क्षेत्राला योग्य उमेदवार द्यावा अन्यथा आम्ही बाहेर पडू असा ईशारा दिला आहे.