Friday, October 4, 2024
HomeAheriमाजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांची श्रीश्री.हरिगुरुचांद मंदिर येथील कीर्तन व...

माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांची श्रीश्री.हरिगुरुचांद मंदिर येथील कीर्तन व कथा कार्यक्रमाला विशेष उपस्थिती…

 VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी

Gadchiroli /अहेरी,२७ सप्टेंबर २०२४::- तालुक्यातील नागेपल्ली ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या मोद्दूमाडगू येथील बंगाली बहुल भागात मतूआ मिशन आलापल्ली द्वारा श्रीश्री.हरिगुरुचांद मंदिर येथे कीर्तन व कथा कार्यक्रमाचे आयोजिन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज हे होते.त्यावेळी मतूआ मिशनच्याच्या सदस्यांनी त्यांचे शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यावेळी राजे साहेबांनी श्रीश्री.हरिगुरूचांद स्वामीचे पुष्प अर्पण करून दर्शन घेतले.

गडचिरोली जिल्ह्यातील समस्त नागरिकांना ‘सुख समृद्धी आनंदी जीवन लाभो’ श्रीहरिगुरुचांद स्वामी चरणी प्रार्थना केली.तसेच तीथे उपस्थित भक्त जणांना मोलाचं मार्गदर्शन केले. मोद्दूमाडगू येथील नवनिर्मित श्रीश्री.हरिगुरुचांद मंदिरच्या जागे करिता राजे साहेबांनी 1 लाख 15 हजार रुपये आर्थिक मदत केल्याने.

मतूआ मिशन आलापल्ली व श्रीश्री.हरिगुरुचांद मंदिर कमिटीच्या सदस्यांनी राजे साहेबांचे मनःपूर्वक आभार मानले.!त्यावेळी मतूआ मिशन आलापल्लीचेचे अध्यक्ष निखिल मंडल,हरिदास हलदार,सुजय बच्छाड,जितेंद्रजी बिश्वास,सचिनजी बिश्वास, गणेश सिकदार, सदन मालाकार,सुकमल हलदार व भक्तगण तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

shrawan wakode

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular

बातमी कॉफी पेस्ट नका करू शेअर करा प्लिज....