Tuesday, April 16, 2024
HomeChamorshi"पाऊस आला रे आला" लखमापूर बोरी येथील नाल्यात वाहतात दारूच्या खाली बाटला...

“पाऊस आला रे आला” लखमापूर बोरी येथील नाल्यात वाहतात दारूच्या खाली बाटला…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी 

गडचिरोली/लखमापूर बोरी ०२ एफ्रिल २०२४::-  गडचिरोली जिल्ह्यात कठोर दारू बंदी असताना चामोर्शी तालुक्यातील लखमापूर बोरी इथे जवळपास प्रत्येक गटर नाल्यात मोठ्या संख्येने दारूच्या रिकाम्या बाटल्या आढळून येत असतात.    अचानक अवकाळी मुसळधार पाऊस आला रे आला की या सर्व रिकाम्या बाटला गावच्या खाल उतार भागाकडे जाणाऱ्या नालीच्या दिशेने म्हणजेच ग्रा.पं. कार्यालय जवळच्या परिसरात प्लास्टिक घन कचऱ्याच्या स्वरूपात जमा होतात.   पोलीस प्रशासनाचे गावाकडे नेहमी लक्ष्य असताना गावात एवढी अफाट दारू कोण विकत असावी , ही दारू बाहेर गावातून आपल्या गावात येत तर नसेल, प्रत्येक नाल्यातून असंख्य दारूच्या रिकाम्या बाटला पोहताना बघून असे ना-ना प्रकारचे प्रश्न उपस्थित होत असतात.

  ग्रा.पं. कार्यालयाकडे अचानक शासकीय कर्मचारी किंवा इतर पाहुणे भेट द्यायला गेले की त्यांना कार्यालयाकडे जाणाऱ्या मार्गावरील नाल्यात किंवा परिसरात असे असंख्य दारूच्या रिकाम्या बाटल्या दिसल्यास पाहुणे आपल्या गावाबद्दल चांगले विचार करतील की वाईट विचार करतील…?

  पोलीस प्रशासनाच्या कृपेने गावात दारू बंदी असून एवढ्या दारूच्या रिकाम्या बाटल्या येतात कुठून असा प्रश्न महिला वर्गाकडून केला जात आहे.

shrawan wakode

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular

बातमी कॉफी पेस्ट नका करू शेअर करा प्लिज....