Tuesday, April 16, 2024
HomeAramoriमहायुतीचे अधिकृत उमेदवार तथा विद्यमान खासदार अशोकजी नेते यांच्या हस्ते आरमोरी येथे...

महायुतीचे अधिकृत उमेदवार तथा विद्यमान खासदार अशोकजी नेते यांच्या हस्ते आरमोरी येथे प्रचार कार्यालयाचे उदघाटन…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी 

अब कि बार चारसौ पार विजय संकल्प करत मोदीजी कि गॅरंटीसाठी पुन्हा कमळ फुलवा.

खासदार अशोकजी नेते प्रतिपादन.

गडचिरोली/आरमोरी,०२ एप्रिल २०२४::-आरमोरी येथे आज दिनांक ०२ एप्रिल २०२४ मंगळवारी भारतीय जनता पार्टी-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी -आरपीआय-पिरिपा महायुतीचे गडचिरोली चिमूर लोकसभा मतदार संघाचे अधिकृत उमेदवार श्री.अशोक महादेवराव नेते यांच्या प्रचारार्थ प्रचार कार्यालयाचे उद्घाटन सहकार महर्षी अरविंदजी सा.पोरेड्डीवार यांच्या शुभहस्ते आरमोरी येथील जूना बस स्टॅन्ड जवळ येथे पार पडले.

    यावेळी प्रामुख्याने मंचावर महायुतीचे उमेदवार तथा खासदार अशोक नेते,सहकार महर्षी अरविंद सावकार पोरेड्डीवार,आमदार कृष्णाजी गजबे,लोकसभा प्रभारी तथा माजी आमदार अतुलभाऊ देशकर,लोकसभा निवडणूक प्रमुख किसनजी नागदेवे, प्रकाश सावकार पोरेड्डीवार , जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम,जिल्हा महामंत्री सदानंद कुथे,जिल्हा उपाध्यक्ष प्रणय खुणे,जिल्हा उपाध्यक्ष अरुण हरडे, तालुकाध्यक्ष पंकज खरवडे, तालुकाध्यक्ष सुनिल पारधी, तालुकाध्यक्ष चांगदेव फाये, नंदूजी काबरा,जिल्हा सचिव नंदूजी पेठ्ठेवार,पवन नारनवरे, नंदुजी कल्लंतरी, गणपत सोनकुसरे, ईश्वर पसेवार,भारत बावनथडे, संगिता रेवतकर,रोशनी पारधी, मिनाक्षीताई गेडाम,ॲड.उमेश वालदे,सागर निरंकारी, वसंता दोनाडकर, योगेश नाकतोडे आदी यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

“प्रचार कार्यालयाच्या उदघाटन प्रसंगी खासदार अशोक नेते”

   यांनी बोलतांना म्हणाले की.प्रधानमंत्री यांच्या कार्यकर्तृत्वावर जागतिक विकासाकडे भारताची वाटचाल आहे.मि केंद्रातुन अनेक विकास कामे खेचून आणले आहे.ज्यात रेल्वे चा प्रश्न असेल,सिंचनाचा प्रश्न असेल,रस्त्यांचे प्रश्न असेल,केंद्रीय विद्यालय, एकलव्य विद्यालय, मेडिकल कॉलेज, सुरजागड लोह प्रकल्प असे अनेक कामे माझ्या प्रयत्नाने मंजूर करून घेण्यात सिंहाचा वाटा आहे.एवढंच नाहीतर रेल्वे सर्व्ह लाईन चे सुद्धा काम मंजूर केलेले आहे. याबरोबरचं वडसा गडचिरोली रेल्वे लाईन चे काम प्रगती पथावर सुरु आहे.   जे काम साठ वर्षात काँग्रेसनी केले नाही ते पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांनी या दहा वर्षात ऐतिहासिक निर्णय घेत देशाला पुढे नेण्याचं काम केले.त्यांनी पाचशे वर्षाचा राम मंदिराचा प्रश्न असेल,तिन तलाख,काश्मिर ३७० धारा,असे अनेक निर्णय घेत केलेल्या कार्य कर्तुत्वावर पुन्हा तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनतील व अब कि बार चारसौ पार विजय संकल्प करत मोदीजी कि गॅरंटीसाठी पुन्हा कमळ फुलवा व गडचिरोली चिमूर लोकसभेचा प्रचंड बहुमताने विजयी करा.असे प्रतिपादन खा.नेते यांनी या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी केले.

    यावेळी कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी सहकार महर्षी अरविंदजी सा. पोरेड्डीवार यांनी बोलतांना म्हटले आपल्याला कार्यकर्तृत्वान, विकासात्मक पंतप्रधान लाभले याचा अभिमान वाटला पाहिजे. कोणतीही व्यक्ती आपल्या कर्म फळाने मोठा होतो.शेतकऱ्यांच्या विचार धारेचे सरकार आहे. नुकतेच शेतकऱ्याच्या खात्यात पैसे येण्याचे काम चालू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सुद्धा आनंदाचे वातावरण आहे.अब‌ कि बार चारसौ पार करत विश्वासाने विजय आपलाचं आहे असे प्रतिपादन उदघाटन प्रसंगी केले.

याप्रसंगी आमदार कृष्णाजी गजबे, लोकसभा प्रभारी तथा माजी आमदार अतुलभाऊ देशकर,लोकसभा निवडणूक प्रमुख किसनजी नागदेवे यांनी सूद्धा मार्गदर्शन केले.

shrawan wakode

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular

बातमी कॉफी पेस्ट नका करू शेअर करा प्लिज....