Tuesday, April 16, 2024
HomeNagabhidनागभीड तालुक्यातील तळोधी बा. येथे जि.प क्षेत्र पदाधिकारी कार्यकर्ता मार्गदर्शन सभा संपन्न...

नागभीड तालुक्यातील तळोधी बा. येथे जि.प क्षेत्र पदाधिकारी कार्यकर्ता मार्गदर्शन सभा संपन्न…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी 

महायुतीचे अधिकृत उमेदवार तथा खासदार अशोकजी नेते व चिमुरचे लोकप्रिय आमदार कीर्तीकुमार उर्फ बंटीभाऊ भांगडिया यांच्या नेतृत्वाखाली सभा संपन्न.

आमदार बंटीभाऊ भांगडिया,यांनी भाजप महायुतीचे उमेदवार अशोक नेते यांना विजयासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.   अब की बार ४०० सौ पार व पंतप्रधान नरेंद्र मोदी ग्यारंटी साठी कमळ पुन्हा फुलविण्याची विनंती उमेदवार अशोक नेते यांनी केली.

नागभीड, ०२ एफ्रील २०२४::- काॅग्रेसचे यशवंत मेश्राम सरपंच मांगरुड,जनकापुर येथील रविंद्र बोरकर,डुकरु नान्हे यांचा भाजपा मध्ये प्रवेश.

 महायुतीचे अधिकृत उमेदवार तथा खा.नेते यांनी बोलतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनहित कल्याणकारी योजना अमलात आणल्या असून मी खासदार असताना पाच वर्षात विविध विकासाची कामे केली आहे. भारत विश्वगुरू करण्यासाठी व अब की बार ४०० सौ पार साठी सलग तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी पक्षा ने मला भाजप महायुती ची उमेदवारी दिली असल्याने भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी जोमाने पुन्हा कमळ फुलविण्याची विनंती महायुतीचे उमेदवार अशोक नेते यांनी केले.

    भारत उज्वल देश घडविण्यासाठी व सलग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी उमेदवार अशोकजी नेते यांना परत खासदार करण्याचे आवाहन आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी केले.

नागभीड तालुक्यातील तळोधी बा.- गोविंदपुर व वाढोणा गिरगाव येथील जि .प.क्षेत्राची राधाकृष्ण मंगल कार्यालय तळोधी बा.येथे बैठक झाली असता यावेळी भाजप जेष्ठ नेते वसंत वारजुरकर, मोरेश्वर पा.ठिकरे,आवेश पठाण सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती नागभीड,रमेश पाटील बोरकर, उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती,कल्पना मस्के सरपंच तळोधी,राजेश घिये उपसरपंच तळोधी,होमदेव मेश्राम माजी भाजप तालुका अध्यक्ष नागभीड, जगदिश सडमाके तालुका महामंत्री,रमेश बोरकर गिरगाव,अशोक ताटकर,गिताताई बोरकर,पद्माताई कामडी,पुष्पाताई नंदनवार,मंदाताई काश्यप,रुपेश डोरलीकर,संजय घोनमोडे सुधाकर कामडी,सोनु कटारे,नरेश खोब्रागडे,दिलीप कामडी,छगन कोलते सरपंच किटाळी आदी उपस्थित होते.

यावेळी तळोधी – गोविंदपुर व गिरगाव – वाढोणा जि.प. क्षेत्रातील बुथ अध्यक्ष शक्ती केंद्र प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

संचालन व आभार जगदीश सडमाके यांनी केले.

shrawan wakode

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular

बातमी कॉफी पेस्ट नका करू शेअर करा प्लिज....