Tuesday, April 16, 2024
HomeAshtiश्री हनुमान मंदीर प्रशांत घाम चपराळा मंदिरात यावर्षी मोठ्या उत्साहात रामनवमी उत्सव...

श्री हनुमान मंदीर प्रशांत घाम चपराळा मंदिरात यावर्षी मोठ्या उत्साहात रामनवमी उत्सव साजरा होणार,, देवस्थानचे अध्यक्ष संजय पंदिलवार यांची माहिती…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी 

गडचिरोली/आष्टी,०२ एफ्रिल २०२४::- चामोर्शी तालुक्यातील चपराळा हे एक भाविकांच्या श्रद्धेचे स्थान आहे. येथे कार्तिक स्वामी महाराजांचे मंदिर आहे. त्याला लागून साईबाबा, शंकर, मारोती इत्यादीचे मंदिर व शिवलिंग आहे. येथे नेहमीच भाविकांची गर्दी असते. महाशिवरात्रीला येथे यात्रा भरते. हनुमान जयंतीला येथे काला व भजन किर्तनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.मंदिरापासून जवळच वर्धा-वैनगंगा नदीचा संगम आहे. यालाच प्रशांत धाम असे म्हणतात. नदीचे पात्र विस्तीर्ण असून त्यांचे दोन्ही काठ नैसर्गिक सौंदर्याने नटलेले आहेत. मंदिरासमोरून आजु-बाजुला घनदाट सागवानाची झाडे व काही चंदनाचे वृक्ष आहेत. या मंदिराच्या परिसरात जंगल असल्यामुळे भाविकांना व पर्यटकांना वृक्ष छायेचा आश्रय घेऊन थांबण्यास अधिक मौज वाटते यावर्षी श्री हनुमान मंदीर प्रशांत घाम चपराळा येथील मंदिरात रामनवमी उत्सव व पालखी पदयात्रा कार्यक्रम बाबत श्री हनुमान मंदीर प्रशांत घाम चपराळा मंदिर समितीच्या वतीने बैठक घेण्यात आली आष्टी परिसरात श्री हनुमान मंदीर प्रशांत घाम चपराळाच्या वतीने पालखी पदयात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती श्री हनुमान मंदीर देवस्थानचे अध्यक्ष संजय पंदिलवार यांनी दिली.

shrawan wakode

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular

बातमी कॉफी पेस्ट नका करू शेअर करा प्लिज....